मुंबई : ‘आय घोषणा योजना २०१६’ च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आयकर विभागातर्फे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या योजनेचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत; यासाठी कार्यरत आहेत. पवई, सायन आणि अंधेरी या विभागांत घरोघरी पत्रक वितरित करण्यात आले आहेत. या विभागातील अधिकारी जागोजागी व्यापारी, व्यवसायिक, सीए, वकील संघटनांसह लोकांमध्ये सभा व चर्चासत्रे घेत असून, याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आयकर विभागातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
आय घोषणा योजनेसाठी प्रयत्न
By admin | Published: July 01, 2016 4:23 AM