अमरावती - खगोलशास्त्रानुसार ४ जुलै रोजी पृथ्वी व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त राहणार आहे. याला ‘एपीहॅलिऑन’ म्हटले जाते. पृथ्वी व सूर्यामधील सरासरी अंतर १५ कोटी किमी आहे. या अंतराला एक खगोलीय एकक म्हटले जाते. या दिवशी हे अंतर १५.२ कोटी किमी राहणार आहे. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने ही घटना घडत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
हळूहळू सरकत आहेत पाच खंड दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंमी ओढली जात आहे व पाच खंडदेखील हळूहळू सरकत असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आर्थर एडिंग्टन आहेत. त्यांच्यानुसार सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे संपली आहेत. आणखी ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल.