ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 04 - कोल्हापूर, सांगली आणि कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली.
मिळालेला माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरण परिसर असल्याचे सांगण्यात येत असून या भूकंपाचे धक्के पुणे, कोल्हापूर आणि सांगली परिसरात जाणवले. तसेच, भूकंपाचा केंद्रबिंदून जमिनीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळाले नाही. मात्र, या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातही कोयना धरण परिसरात भूकंपाचे अतिशय सौम्य धक्के जाणवले होते.
Mild tremor hits Maharashtra's Koyna region
Read @ANI_news story | https://t.co/whblYSsylxpic.twitter.com/nFngPdkZtc— ANI Digital (@ani_digital) June 3, 2017