लोणावळा : स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने सामाजिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानातील एका नवख्या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्प येथून राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. टेकबिन (टेक्नॉलॉजिकल अॅडव्हॉन्स बिन) नावाचे एक मशिन शहरात जागोजागी लावण्यात आले आहे. या मशिनची खासियत म्हणजे यामध्ये कचरा टाकला, की त्या बदल्यात कचरा टाकणाऱ्याला चॉकलेट मिळते. नागरिकांना कचरा कुंडीतच टाकण्याची सवय लावण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपक्रम ठरेल, असे या मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. लोहगड दर्शन उद्यान, भांगरवाडी येथे बसविण्यात आलेल्या या टेकबिन मशिनचे उद्घाटन नुकतेच ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी कंपनीचे संस्थापक अभिजित देवकर, गणेश जाधव, अभियंता विनोद बच्छाव, सुशांत कुमठेकर, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेविका जयश्री काळे, शकुंतला इंगुळकर, प्रकाश काळे, अन्वर निंबर्गी उपस्थित होते. (वार्ताहर)>तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे व नगराध्यक्ष अमित गवळी यांनी मागील वर्ष-दीड वर्षापासून लोणावळा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा हाती घेतला. त्यादृष्टीने विविध उपक्रम राबवीत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला. त्यांच्याच प्रयत्नांतून मुंबईस्थित एशियन गॅलट या टेकबिन मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने पथदर्शी प्रकल्प म्हणून या मशिन लावण्याची सुरुवात लोणावळ्यापासून केली आहे.
मशिनमध्ये कचरा टाकून चॉकलेट खा!
By admin | Published: June 29, 2016 1:31 AM