मुंबई : पर्युषणपर्व व गणेशोत्सव काळात मांसविक्री प्रत्येकी चार दिवस बंद ठेवण्याची भाजपाची मागणी आहे़ मात्र मित्रपक्षांनी याविरोधात भूमिका घेतली आहे़ शिवसेना आणि मनसेच्या दबावाखाली पालिका प्रशासनानेही मांसविक्रीवर बंदी नसल्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे युतीमध्ये आहाराचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत़ भाजपाने गणेशोत्सव आणि पर्युषणपर्वात प्र्रत्येकी चार दिवस मांसविक्री बंद ठेवा, अशी मागणी लावून धरली आहे. तत्पूर्वी पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून पर्युषणपूर्व काळाचा पहिला दिवस म्हणजे २९ आॅगस्ट आणि गणेशोत्सवात ५ सप्टेंबर रोजी पशुवधगृह बंद राहील, अशी घोषणा केली़ ही मागणी मित्रपक्षाकडूनच होत असताना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पशुवधगृह बंद राहील, मांसविक्री नाही, असे आज निदर्शनास आणून भाजपाला शह दिल्याचे दाखवून दिले़ यामुळे युतीमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़.
आठ दिवस मांसविक्री बंद ठेवा - भाजपा
By admin | Published: August 30, 2016 5:31 AM