जयंत धुळप / अलिबागरायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ गावांपैकी काही गावे पूर्ण, तर काही गावांतील काही भाग ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून भारत सरकारच्या पर्यावरण व वनविभागाच्या ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात विकासकामे करण्यासाठी मॉनेटरिंग कमिटीची (सनियंत्रण समिती) पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीपूर्वी पाच दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.भारत सरकार पर्यावरण विभागाच्या १ मार्च २०१७ च्या परिपत्रकानुसार भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव जी. गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची मॉनेटरिंग कमिटी दोन वर्षांसाठी गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव रायगड जिल्हाधिकारी हे आहेत.
पर्यावरणीयदृष्ट्या ८९ गावातील क्षेत्र संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 1:54 AM