शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

इको टुरिझमच्या विकास निधी वाटपात विदर्भाला डावलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:29 AM

साडेआठ कोटींपैकी गडचिरोलीसाठी केवळ ८३ लाखाचा निधी

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाने ८ कोटी ३५ लाख २८ हजार निधी खर्चास मान्यता दिली. साठेआठ कोटीपैकी फक्त ८३ लाख ७५ हजारांचा निधी विदर्भातील गडचिरोलीच्या वर्धम फॉसिल पार्कसाठी दिला गेला असून, इतर निधी नाशिक, सातारा, अहमदनगर आणि पुण्याकडे पळविण्यात आला आहे. विदर्भात इको टुरिझमचे ५२ केंद्र असतानादेखील निधी वाटपात विदर्भाला डावलले गेल्याचे वृत्त आहे.वन्य जीवांचे जीवनचक्र अबाधित ठेवण्यासोबतच, इको टुरिझम राज्य योजनेंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, ज्या सुविधा या ठिकाणी नसतील त्या देण्यासाठी उपाययोजना करावी यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ कार्यरत आहे. बालोद्यान सुशोभीकरण, निरीक्षण मनोरा, माहिती फलक, निसर्गपूरक साहित्यांचादेखील यामध्ये समावेश आहे. मात्र बहुतेक ठिकाणी धार्मिक स्थळांनाच पर्यटन केंद्र दाखवून इको टुरिझमचा निधी वळविला गेला आहे. अनेक ठिकाणी पायऱ्या, कुं पण, डागडुजी दाखविली गेली आहे. राज्य पर्यटन मंडळ, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या कार्यकारी समितीने २०१७-१८ या वर्षांसाठी ८३ लाख ७५ हजारांच्या उपनिधी खर्चास मान्यता दिली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया येथील ११ जिल्ह्यांत निसर्ग पर्यटनाचे ५२ केंद्र आहे. मात्र ११ जिल्ह्यांपैकी केवळ गडचिरोलीस ८३ लाखांचा निधी देऊन मंडळाने बोळवण केली आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे, पर्यटन मंडळ विदर्भाचे असतानाही विदर्भातील जिल्ह्यांना निधी वाटपात डावलले गेल्याने नेत्यांविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.असे झाले निधीचे वाटप ...नाशिकच्या ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रासाठी ३ कोटी ६७ लाख,२२ हजार, सातारा येथील चंदन-वंदनसाठी १ कोटी २७ लाख, ५० हजार, अहमदनगर येथील येडूआई देवस्थान पिंपळदरीसाठी १ कोटी ११ लाख ८४ हजार, गडचिरोली येथील वर्धम फॉसिल पार्कसाठी ८३ लाख ७५ हजार, पुणे येथील पिंपळगाव वनउद्यानासाठी ७० लाख ३४ हजार, औरंगाबाद येथील अजिंठा वनउद्यानासाठी ३१ लाख ७९ हजार, धुळे येथील तोरणमाळसाठी २५ लाख आणि सोलापूरच्या खुडूससाठी १७ लाख ८४ हजार रुपये मंजूर झाले आहेत.२०१० मध्ये मोर्णा धरणाजवळ १२ इको टुरिझमला मंजुरी देऊन १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. या वर्षीसुद्धा १ कोटीची तरतूद करण्यात आली; मात्र अकोल्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.-डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी आमदार, अकोला.