शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

नाट्यसंमेलनाला आर्थिक चणचण

By admin | Published: February 07, 2015 2:58 AM

संमेलन सुरळीत होईल, असे आयोजकांकडून छातीठोकपणे सांगितले जात असले तरी आयोजक संस्थेला अजूनही निधीची चणचण भासत आहे.

बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (बेळगाव) : ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे शनिवारी उद्घाटन होणार आहे. हे संमेलन सुरळीत होईल, असे आयोजकांकडून छातीठोकपणे सांगितले जात असले तरी आयोजक संस्थेला अजूनही निधीची चणचण भासत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर, परदेशातील मराठी लोकांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आमच्या झोळीत दान टाकावे अशी याचना संयोजकांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा ५० लाखांचा निधीही अद्याप नाट्य परिषदेकडे मिळालेला नाही. मराठी-कन्नड वादामुळे नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने स्थानिक राजकारणी व्यक्तींना संमेलनाच्या आयोजनापासून दूर ठेवले. परिणामी संमेलनाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सुरुवातीपासूनच उभा आहे. या संमेलनासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च होईल, असे सुरुवातीला परिषदेकडून सांगण्यात येत होते. पण निधी उभा राहात नाही, हे पाहून खर्चावर नियंत्रण आणत सव्वा ते दीड कोटी रुपयांत संमेलन उरकायचे, असा निर्णय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.संमेलनासाठी निधी मिळावा म्हणून बेळगाव नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी पुण्यातील काही उद्योजकांशी याविषयी चर्चा केली. पण यात त्यांना कितपत यश आले हे समजलेले नाही. निधी संकलनाविषयी लोकूर म्हणाल्या, निधीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. बेळगावातील मराठी लोकांनी संमेलनासाठी आर्थिक मदत केलेली आहे. ती पुरेशी नाही. त्यामुळे परदेशात जे अनिवासी मराठी लोक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून निधीसाठी आवाहन केलेले आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कर्नाटक सरकारकडून या संमेलनासाठी काहीही निधी मिळालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही वादाला तोंड न फुटू देता संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. सीमावादाचा मुद्दा या संमेलनात नाही. या प्रश्नावरून काही वादळ उठू नये म्हणून नाट्यसंमेलनात कुठलेही परिसंवाद घेतले नाहीत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.