शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांना दणका! अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 3:22 PM

ED attaches former home minister Anil Deshmukh assets worth Rs 4 crore 20 lakhs: मनी लॉण्ड्रींग प्रकरणी ईडीची अनिल देशमुखांविरोधात मोठी कारवाई

मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयानं जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. ED attaches former home minister Anil Deshmukh assets worth Rs 4 crore 20 lakhs ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी वारंवार कार्यालयात बोलावलं. त्यासाठी समन्स जारी करण्यात आलं. मात्र तीन समन्सनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत.  देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र हे दोघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात ईडीला त्यांच्या पत्नी आणि मुलाची चौकशी करायची होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं अनिल देशमुखांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी घातल्या. देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आली. या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. 'आता केवळ ४ लाख २० कोटी रुपये जप्त झाले आहेत. लवकरच १०० कोटी जप्त होतील आणि देशमुखांवरदेखील जप्ती येईल', असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशमुखांच्या अटकेचे संकेत दिले. त्याला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना आधीच कशी मिळते? ते इतक्या विश्वासानं दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का असा सवालदेखील त्यांनी विचारला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसParam Bir Singhपरम बीर सिंग