शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:48 AM

Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

कोल्हापूर : माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवसस्थानी बुधवारी पहाटे ईडीने छापा टाकला. कागलसह हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 1 जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला होता. या ट्विटनंतर पहिल्यांदा अनिल परब (Anil Parab) आणि आता हसन मुश्रीफ यांना ईडीकडून झटका बसला आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला 1500 कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट नातेवाईकांना दिले गेले अशी तक्रारही किरीट सोमय्यांनी केली होती.

बोगस बँक अकाउंटमध्ये व्यवहार झाल्याचा आरोपहसन मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या तिथून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले होते. तसेच, 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफKirit Somaiyaकिरीट सोमय्या