Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे. ईडीचे अधिकारी अनिल देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी दाखल झालेत. त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे आणि कागदपत्र देखी तपासली जात आहे. इतकंच काय तर घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) सशस्त्र बंदोबस्त करण्यात आला आहे. पण अनिल देशमुख नेमके आहेत कुठे? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. ED raids in Mumbai Nagpur crpf security deployed But where exactly is Anil Deshmukh
नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीचे अधिकारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दाखल झाले. यावेळी घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले. पण अनिल देशमुख घरात नसल्याची माहिती समोर आली. नागपूरच्या एसीपींनी देखील अनिल देशमुख घरी नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर मुंबईत वरळी येथील अनिल देशमुखांच्या निवासस्थानी देखील ईडीचे अधिकारी सकाळपासून चौकशी करत आहेत. पण मुंबईतही अनिल देशमुख नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अनिल देशमुख नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. पण त्यानंतर ते दिल्लीहून परतून पुण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख सध्या पुण्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.