महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) समन्स बजावले आहे. त्यांना दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आलं असून बुधवारी (१५ जून) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये ७ ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते.
यापूर्वी ईडीनं अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत तब्बल १२ तास झाडाझडती केली होती. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यावेळी रिसॉर्टची माहिती घेतानाच मूळ जागामालक विभास साठे यांचा जबाबही ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवण्यात आला होता. तर दुसरीकडे अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. परंतु याच्याशी आपला संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.