‘ईडी’ही करणार जलसिंचन घोटाळ्याची चौकशी, महामंडळाकडून मागविली कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:39 AM2020-10-18T11:39:33+5:302020-10-18T11:41:00+5:30
१९९९ ते २०११ या कालावधीत राज्यात राबविल्या गेलेल्या सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याची तक्रार विरोधी पक्षाने केली होती. (irrigation scam)
मुंबई : काँग्रेस आघाडीच्या काळात घडलेल्या कथित जलसिंचन घोटाळ्याची चौकशी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. त्यासंबंधी व्यवहाराच्या सर्व कागदपत्रांची मागणी पाटबंधारे विभाग व संबंधित महामंडळाकडे करण्यात आल्याचे
सूत्रांनी सांगितले.
१९९९ ते २०११ या कालावधीत राज्यात राबविल्या गेलेल्या सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याची तक्रार विरोधी पक्षाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर एसआयटी नेमून तपास करण्यात आला. त्यांनी क्लीन चिट दिली. मात्र आता या प्रकरणात ईडी तपास करणार आहे.