शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेवर ‘ईडी’ची नजर! कासकरवर आतापर्यंत ३ गुन्हे : सराफाकडून दागिन्यांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:35 AM

डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे.

ठाणे : डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली. जवळपास तीन आठवड्यांच्या तपासामध्ये पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक केली. यामध्ये छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरचाही समावेश आहे. कासकरविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात कासकरच्या टोळीने सराफा व्यावसायिकाकडून ५० लाखांचे दागिने खंडणी स्वरूपात घेतले. याशिवाय, गोराई येथील जवळपास २५० कोटी रुपयांच्या जागेच्या वादातही त्याने मोठी खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात थेट दाऊद इब्राहिमचे नाव समोर आल्यानंतर ईडीनेही हालचाली सुरू केल्या.खंडणीच्या पैशांतून डी-कंपनीने जमवलेल्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास सक्तवसुली संचालनालयाने सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचीही मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कासकरच्या चौकशीदरम्यान खंडणीविरोधी पथकाने त्याच्याकडून मालमत्तेचाही तपशील काढण्याचा प्रयत्न केला. कासकरचे एकाही बँकेत खाते नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. अवैध मार्गाने जमवलेला पैसा कुणी सहसा बँकेत ठेवतच नाही. त्यामुळे पोलिसांनीही त्याच्या या जबाबावर विश्वास ठेवला. मात्र, दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या भावांनी नातलगांच्या नावे मालमत्ता घेतली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांचे हस्तक आणि नातेवाइकांचेही आर्थिक व्यवहार तसेच मालमत्तांचा तपशील सक्तवसुली संचालनालय आणि इतर यंत्रणा घेत आहेत. छोटा शकीलच्या माध्यमातून डी-कंपनीला आर्थिक रसद पुरवणारा मटकाकिंग पंकज गंगर हा या टोळीचा एकमेव फायनान्सर नाही. गंगरसारखे आणखी किती फायनान्सर अर्थपुरवठा करून डी-कंपनीला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचीही चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमthaneठाणे