शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 5:52 PM

आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डावरील ईडीच्या छापेमारीवर मोठा खुलासा केला आहे.

मुंबई: सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीची पुणे आणि अन्य ठिकाणांवरील वक्फ बोर्डावर छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीचा संबंध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी जोडला जातोय. पण, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरू असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 

वक्फ बोर्डात छापा नाहीच...पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. छापे बोर्डावर पडले नाहीत, तर वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर पडले आहेत. पुण्यातील एक ट्रस्ट आहे, ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे, हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. 19 मे, 2005 ला चॅरिटी कमिश्नरकडून वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झाला. डीन रजिस्ट्रेशनने लोकशाही आघाडी सरकार आलं तेव्हा वक्फ अॅक्ट लागू झाला. त्यामुळे चॅरिटी कमिश्नरकडे असलेल्या संस्था त्याचं डीम रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय चॅरिटी कमिश्नरने घेतला. आम्ही वक्फ अॅक्ट 1995 आम्ही लागू केला, असं नवाब मलिक म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काही चॅनलवाल्यांनी सांगितलं की, मलिकच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू, मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे. त्यात पुण्यात एमआयडीसीत 5 हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करुन ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते.

तीस हजार संस्थांची चौकशी करावीवक्फ बोर्डाच्या तीस हजार संस्था आहेत, त्यांची चौकशी करावी अशी मी ईडीला विनंती करेन. आमच्या क्लिनअप अभियानात ईडीचं सहकार्य मिळत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. लखनऊ शिया वक्फ बोर्डासाठी तिथल्या शिया कम्युनिटीने पंतप्रधानांना पत्रं लिहिलं होतं. सीबीआयकडे प्रकरण दिलं. वसीम रजाच्याही भानगडी आहेत त्याकडेही लक्ष द्या. आम्हाला तुमचं सहकार्य हवं. 30 हजार प्रकरणं देणार आहोत. गेल्या एका महिन्यापासून जे क्लिनअप अभियान सुरू केलं आहे, त्यावरून काहींना वाटत असेल मलिक यांना घाबरवू. तुम्ही सहकार्य देत आहात ही चांगली गोष्ट आहे. कुणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडीचा वापर होत असेल तर विभागच चुकींचा संदेश जात आहे, असं वाटतं. तुम्ही सहकार्य मागाल तर देऊ, पण आम्ही जी लढाई सुरू केली आहे, चुकीच्या लोकांना आत टाकण्याची लढाई सुरू केली त्यामुळे अशा बातम्या पसरवून मलिकांची प्रतिमा मलिन करता येणार नाही. वक्फ बोर्डात ईडी घुसली म्हणून मलिकांना घाबरवता येणार नाही, असा इशाराही मलिक यांनी यावेळी दिलाय.

वक्फ अॅक्टनुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे

एका बनावट कागदपत्राद्वारे 30 डिसेंबर, 2020 चा दस्ताऐवज वापरुन 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. जे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉईंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली. त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली, असंही मलिकांनी सांगितलं. मलिक पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर वक्फ अॅक्टनुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे. कोणी आमच्याकडे तक्रार केल्यास त्यावर आम्ही चौकशी समिती नेमू शकतो. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली. निवडणुकीद्वारे दोन जणांचे नाव आले होते. त्यातील एकाची नियुक्ती केली गेली. काही जागा भरायच्या आहेत, पण पहिल्यांदाच फुलफेज बोर्ड बनलं आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय