- समीर देशपांडेएक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वालाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.
साक्षरतेचे आव्हान मोठेकेंद्राने नव भारत साक्षरता कार्यक्रम' राबविण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून, त्यानुसार महाराष्ट्रातही काम सुरु झाले आहे. सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरु आहे. ३१ मार्च, २०२७ पर्यंत सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.=
निरक्षरतेची कारणे- कुटुंबातील गरिबी- रोजगारासाठी स्थलांतर- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष- शैक्षणिक वातावरणाचा अभाव- शाळा जवळ नसल्याचा परिणाम
जिल्हावार निरक्षरांचे आकडेलातूर - ११.७६१मुंबई - ३४,३२९नागपूर-१४,३२२अहमदनगर- २०,७०२नांदेड - १७,४४७अकोला - ६.२५०नंदुरबार- ६८.८२०अमरावती - ९.४१८नाशिक- २८,२५३छ. संभाजीनगर - १७,८३७परभणी- १०,०२५भंडारा - ४,४२७पुणे - ३३,३७५बीड- १४,५८२रायगड - १०,३७३बुलढाणा- ११,३२७रत्नागिरी - ६,३३६चंद्रपूर- ९,३७४सांगली - ११.४५८धुळे - ११.१५४सातारा - ११,४१४गडचिरोली - ३७,२००सिंधुदुर्ग- २,६९१गोंदिया - ४,८१७सोलापूर- २१,३०९हिंगोली- ६.२५०ठाणे - ४०,७९६जळगाव - १९,७९०वर्धा - ५,१२३जालना - ११.२८४वाशिम - ३१,६२०कोल्हापूर - १५,४५०यवतमाळ -१२.३२६