मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता ९वी व ११वीचे विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याने दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सूचनाबरहुकूम उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता अशा प्रामाणिक लोकांचा संच बनवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची सध्याची पद्धत आहे. मात्र सध्या या विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करायचा असल्याने वेळ मिळत नाही. त्यामुळे आता सध्याची पद्धत रद्द करून दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता १५०० प्रामाणिक व्यक्तींचा संच करण्याच्या सूचना तावडे यांनी दिल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
शिक्षण विभाग प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात!
By admin | Published: February 13, 2015 1:23 AM