मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी, सुधार समित्यांसह उर्वरित समित्याही जोमाने काम करीत असतात. स्थायी आणि सुधार समितीएवढेच महत्त्व उर्वरित समित्यांना असते. समितीमध्ये दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूर करून घेण्यासह मूलभूत सेवा-सुविधांतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला-बाल कल्याण आणि पर्यावरणाकडेही समित्यांना लक्ष द्यावे लागते. वेळप्रसंगी कारभारात ‘पारदर्शक’ता ठेवत मुंबईकरांचे प्रश्न हाताळणे व ते सोडविण्यासाठी सदस्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. विशेषत: वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांना मुंबईच्या पर्यावरणाचे भान ठेवत ‘सदा हरित’ मुंबईची काळजी घ्यावी लागते. लोकहिताच्या प्रकल्पामध्ये वृक्षतोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देताना वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचा कस लागतो. असाच काहीसा कस महापालिकेतल्या प्रत्येक समितीच्या प्रत्येक सदस्याचा लागत असतो. याच समित्यांपैकी शिक्षण, आरोग्य, बाल कल्याण आणि वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज कसे चालते? याचा ‘समाचार’, नगरसेवकांची ‘शाळा’ या शेवटच्या भागात घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, सुधार समिती आणि सभागृहाचे कामकाज महत्त्वाचे मानले जाते. मात्र येथे नक्की काम होते. काय निर्णय होतात? याची मुंबईकरांना काहीच माहिती मिळत नाही. परिणामी महापालिकेच्या समितीच्या कारभारात पारदर्शकता आली पाहिजे. समितीने नक्की काय निर्णय घेतले? हे मुंबईकरांना माहित झाले पाहिजे. समितीच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची गरज आहे. बैठकीचे इतिवृत्त मुंबईकरांसाठी उपलब्ध झाले पाहिजे. स्थायी आणि सुधार समितीच्या कामाचा अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध झाला पाहिजे.- सीताराम शेलार, डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर प्रमोटींग डेमॉक्रॉसी>शिक्षण समितीशिक्षण समितीमध्ये २६ सदस्य असतात.समितीची पहिली सभा महापौर निश्चित करतील त्या दिवशी व त्या वेळेला घेण्यात येते.सभेस सुरुवातीपासून अखेरपर्यंत निदान नऊ सदस्य उपस्थित असल्याखेरीज सभेचे कामकाज चालविता येत नाही.शिक्षण समितीचे कामकाज चालविण्यासाठी सभा मुख्य महापालिका कार्यालयात भरते. शाळांच्या व्यवस्थापनाच्या संबंधात सभेत कामकाज केले जाते. सभा महिन्यातून एकदा आणि आवश्यक वेळी भरवली जाते.प्रत्येक सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ, ठिकाण आणि महापालिका चिटणिसांनी तयार केलेली कार्यक्रमपत्रिका व सहपत्र सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविले जाते.समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येते. सदस्यांपैकी चारपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविण्यासाठी ४८ तासांच्या आत विशेष सभा बोलावतो.आयुक्तांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना समितीच्या सभेला उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा हक्क आहे. मात्र मतदान करण्याची मुभा नाही.प्रशासनामार्फत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांसंबंधी समिती निर्णय देते.>सार्वजनिक आरोग्य समितीसार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका सार्वजनिक आरोग्य समितीची नेमणूक करते.समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुसऱ्या वेळेस घेता येते.सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ, ठिकाण आणि महापालिका चिटणिसांनी तयार केलेले कार्यक्रमपत्रिका व सहपत्र सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविले जाते.सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणाऱ्या सभेचा दिवस व वेळ निश्चित करतात.कामकाज करण्यासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता असते.>बाजार व उद्यान समितीसार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका बाजार व उद्यान समितीची नेमणूक करते.समितीमध्ये ३६ सदस्यांचा समावेश असतो.समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुसऱ्या वेळेस घेता येते.सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ, ठिकाण आणि महानगरपालिका चिटणिसांनी तयार केलेले कार्यक्रमपत्रिका व सहपत्र सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविले जाते.प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लाने महापालिका चिटणीस होणाऱ्या सभेचा दिवस व वेळ निश्चित करतात.कामकाज करण्यासाठी ९ सदस्यांची आवश्यकता असते.>महिला व बाल कल्याण समितीसार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका महिला व बालकल्याण समितीची नेमणूक करते.समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुसऱ्या वेळेस घेता येते.सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ, ठिकाण आणि महापालिका चिटणिसांनी तयार केलेली कार्यक्रमपत्रिका व सहपत्र सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविले जाते.प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणाऱ्या सभेचा दिवस व वेळ निश्चित करतात.समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता असते.>वृक्ष प्राधिकरणसार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका वृक्ष प्राधिकरणाची पुनर्स्थापना करून १३ नगरसेवक आणि १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक करण्यात येते. वृक्ष प्राधिकरण वृक्षांचा पाडाव रोखण्यासहित उद्यान खात्यामार्फत पुरेशा संख्येने नवीन वृक्षारोपणासाठी समिती काम करते. वृक्ष प्राधिकरण अर्थसंकल्पीय अंदाज तयार करून महापालिकेस त्यांच्या अंतिम संमतीकरिता पाठविला जातो.
शिक्षण, आरोग्य, बाल कल्याण, वृक्षांचा ‘समाचार’
By admin | Published: March 01, 2017 2:07 AM