मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरक्षित पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, असे मत शालेय शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुरुवातीचे दोन आठवडे तरी परीक्षा, अभ्यासक्रम नको
- मुलांची शाळेत जाण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारी करणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असणार असल्याची प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी दिली. शिवाय पहिल्या दोन आठवड्यात तरी किमान परीक्षा, अभ्यासक्रम या गोष्टी पाहू नयेत, मुलांना आधी शाळेत योग्य पद्धतीने व्यक्त होऊ द्यावे.
- संयमाने हाताळण्याची आवश्यकता
- विद्यार्थ्यांना समजून घेऊन अध्यापन करावे, असे आवाहन शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी केले. शिक्षकांनीसुद्धा स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे, असेही त्यांनी सांगितले.
सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ द्याकोरोना काळात शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत राबविलेल्या विविध प्रयोगाचे कौतुक करून शाळा सुरक्षित सुरू करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मोलाची भूमिका बजावू शकतात, असा आशावाद शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी व्यक्त केला.