मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा फलद्रुप न झाल्याने शिक्षक आमदारांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन तावडे आपली हौस भागवून घेत आहेत, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी तावडे यांना लगावला.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी मुसळधार वृष्टी झाली. त्यावेळी मिठी नदी परिसरातील लोकांची घरे बुडाली. त्यांचे उपनगरात स्थलांतर करण्यात आले. मात्र मुलांची ‘शिवम विद्यालयह्ण शाळा स्थलांतरित केली नाही. या शाळेत २ हजार विद्यार्थी शिकत होते. पुरामुळे नष्ट झालेल्या तीन शाळा त्यावेळी उपनगरांत हलवण्यात आल्या. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे आपण मुंबईच्या दक्षिण व मध्य भागातील बंद पडलेल्या तुकड्या उपनगरात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. उपनगरात स्थलांतरित केलेल्या तुकड्यांपैकी एकही तुकडी विनाअनुदानित शाळेत दिलेली नाही तसेच दोन्हीकडे शिक्षकांना पगार दिला जात असल्याचे एकही उदाहरण नाही, असेही पाटील म्हणाले. राज्य शासनाने १२ जून २००७ रोजी तुकड्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला. १०२४ अतिरिक्त तुकड्यांचे पूर्ण समायोजन करण्याची शाळांची मागणी असूनही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागात ते झालेले नाही. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व महामंडळाने ५ सप्टेंबर या शिक्षण दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकदिनी शिक्षक काळ््या फिती लावून काम करणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेने सांगितले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक राज्य सरकारने २८ आॅगस्ट रोजी काढलेल्या अध्यादेशाची शिक्षकदिनी होळी करणार आहेत. शिवाय संपूर्ण दिवस उपवास करून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल, असेही संघटनेने सांगितले. दरम्यान, राज्यभर होणाऱ्या निदर्शने, उपोषण आणि आंदोलनांना मुख्याध्यापक संघटना पाठिंबा देतील, असे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.२८ आॅगस्टच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षकदिनी परळच्या कामगार मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीने या उपोषणास पाठिंबा दिला आहे. शासनाच्या निर्णयाने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना फटका बसणार असल्याच समितीचा आरोप आहे. परिणामी शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.१०६ शिक्षक ‘राज्य शिक्षक पुरस्कार’चे मानकरीठाणे : १०६ शिक्षक व शिक्षिका २०१४-१५ या वर्षाच्या राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या शिक्षकांना उद्या (५ सप्टेंबर) सन्मानित केले जाणार आहे. ७४ शिक्षकांसह ३२ शिक्षिकांचा समावेश आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिकांचाही समावेश आहे. या वर्षापासून प्रथमच स्काऊट-गाइडच्या शिक्षकांसह अपंग शाळेच्या शिक्षकांचीदेखील या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
गृहमंत्री न झाल्याचा शिक्षणमंत्र्यांना राग
By admin | Published: September 05, 2015 1:13 AM