ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीधर तावडे यांच्या पश्चात पत्नी विजया, विनोद व विलास ही दोन मुले, मुलगी जया व जावई असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.