मुंबई : केवळ नवीन रस्ते बांधूनच नव्हे, तर अतिशय कार्यक्षम अशी वाहतूक व्यवस्था निर्माण केल्यानेच शहरी वाहतूक समस्येवर उपाय सापडू शकेल. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून रस्ते सुविधांसाठी जगभरातील सर्वोत्कृष्ट उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच या खर्चातील एक टक्का रक्कम रस्त्यांवरील सुरक्षा जसे सर्व्हेलन्स कॅमेरे, सिग्नल सिस्टम आणि रोड मार्किंगसाठी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.एशियातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय एक्स्पो-स्मार्ट आणि सुरक्षित मोबिलिटी, ट्रॅफिकइन्फ्राटेक एक्सो तसेच पार्किंग इन्फ्राटेक एक्स्पोची सुरुवात १ सप्टेंबरपासून मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या एक्स्पोतील मंचाच्या माध्यमातून ट्रॅफिक आणि पार्किंग बाजारपेठेसह विविध सरकार, योजनाकर्ते, अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि पायाभूत सुविधा विकासक यांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एक्स्पोमध्ये अत्याधुनिक आणि नावीन्यपूर्ण अशा ट्रॅफिक आणि पार्किंग व्यवस्था या तीन दिवस आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या महसूल, पुनर्वसन तसेच सहकार्य, सार्वजनिक काम (सार्वजनिक क्षेत्र वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील हे उद्घाटनाला उपस्थित असतील तर महाराष्ट्र राज्याचे वाहतूक मंत्री दिवाकर रावते हे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. (प्रतिनिधी)
‘कार्यक्षम व्यवस्था हाच वाहतूक समस्येवर उपाय’
By admin | Published: August 27, 2016 1:56 AM