शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे पात्र

By admin | Published: July 16, 2015 12:04 AM

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या ...

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे ते शेंद्रे-सातारा हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त बळी या रस्त्याने घेतले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू काही मृत्यूला निमंत्रण दिल्यासारेखच आहे. महामार्गावरील हा प्रवास सातारकरांच्या जिवाला घोर लावणारा ठरत असून जावे त्यांच्या वंशा... या उक्तीप्रमाणे मंत्र्यांनाही याची अनुभूती घ्यावी, यासाठी येथील संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेने चक्क चार मंत्र्यांच्या नावाने ‘स्वारगेट-सातारा’ या एसटी बसचे आॅनलाईन बुकिंग करून त्यांना तिकीट पाठविले आहे.संस्थेच्या वतीने निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना, वाहनचालकांना पुणे-सातारा हा महामार्गावरील प्रवास करावा लागत आहे. मंत्र्यांनी या मार्गावर एसटी बसने प्रवास केल्याशिवाय त्यांना प्रवाशांच्या व्यथा समजणार नाहीत. यासाठी संस्थेच्या वतीने दि. २ आॅगस्ट या दिवशीचे ‘स्वारगेट ते सातारा’ या प्रवासाचे एसटी बसचे तिकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री विजय शिवतारे आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने काढून त्यांना पाठविण्यात आले आहे. चौघांच्या तिकिटाचे ४२० रूपये आणि आरक्षण शुल्क २० असे एकूण ४४० रुपये संस्थेने अदा केले आहेत.संस्थेच्या वतीने अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे-सातारा या रस्त्याच्या कामाचा ठेका २०१० मध्ये रिलायन्स इन्फ्राला दिला. रिलायन्सने हे काम ३१ मार्च २०१३ पूर्वी पूर्ण करण्याचा करार झाला होता. मात्र, अद्याप २० टक्केही काम झालेले नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्तेसुद्धा खूप छान आहेत, इतके निष्कृष्ट काम महामार्गाचे झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.याबाबत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या; पण कार्यवाही झालेली नाही. मोठा अपघात झाला की मंत्री बैठक घेतात; परंतु रिलायन्स इन्फ्रा त्यांना फसवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, निकृष्ट रस्त्यामुळे पाचशे-सहाशे लोकांचा जीव गेला, याला जबाबदार म्हणून रिलायन्स व ‘न्हाय’वर गुन्हा दाखल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधानांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्याला रिलायन्समुक्त करासंकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिलायन्सच्या निकृष्ट कामाला कंटाळून भीक मांगो आंदोलन केले व जमा झालेल्या पैशातून रिलायन्स इन्फ्राच्या नावानं केक कापून निषेध व्यक्त केला. तसेच महामार्गाच्या निकृ्ष्ट कामाची कॅसेट पाठवून आम्हाला रिलायन्समधून मुक्त करा, असे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.सातारा तुमची वाट पाहतोय...लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी कोल्हापूर, सांगलीला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘सांगली करू चांगली’ असे मराठीतून सांगितले होते. परंतु सातारला नाही आलात. सातारा जिल्हा तसा लहानच. शुद्ध हवा, निसर्गसौंदर्य, शिवछत्रपतींची गादी, थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, डौलात उभा असेलेला प्रतापगड तसेच यशवंतराव चव्हाण यांचे गाव याच जिल्ह्यातले. माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले... असा हा छोटा पण भारी आमचा सातारा पाहायला तुम्ही यावे, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.