पुणे : राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातील ८ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांत करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची नुकतीच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामधील ४६ बालकांची हृदय शस्त्रक्रिया करणे प्रलंबित असल्याचे आढळून आले. मात्र त्यातील ८ बालकांच्या शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक असून, त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी पुण्यातील काही खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, पुणे जिल्हा धर्मादाय रुग्णालय संघटनेचे गोपाळ फडके, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व आदित्य बिर्ला रुग्णालयाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आठ बालकांची हृदयशस्त्रक्रिया होणार
By admin | Published: November 07, 2016 1:47 AM