शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठ महापालिकांकडून ‘अग्निशमन’ बेदखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 5:46 PM

५४८ कोटी अखर्चित : कॅगचे ताशेरे, नगरविकास मंत्रालयाचे पत्र

अमरावती : राज्यातील आठ महापालिकांनी अग्निशमन सेवांचे बळकटीकरण व क्षमता सुधारण्यासाठी आरक्षित केलेला ५४८ कोटींचा निधी अखर्चित ठेवल्याची गंभीर बाब भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी (कॅग) केलेल्या अहवालात नमूद केली आहे. या अहवालाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने हा निधी त्वरित वापरण्याचे निर्देश आठ महापालिकांना दिले आहेत.

राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या निवडक आठ महापालिकांचा यात समावेश आहे. या महापालिकांची सन २०१०-१५ या कालावधीतील आगीचा प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबतची लेखापरीक्षा कॅगकडून करण्यात आली. या आठ महापालिकांमध्ये सन २०११ ते २०१५ या कालावधीत ७०२.९५ कोटी इतकी तरतूद अग्निशमन सेवेसाठी अर्थसंकल्पित करण्यात आली. यापैकी केवळ १५४.७१ कोटी खर्च झाल्याचे व ५४८.२४ कोटी इतका निधी अखर्चित असल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले होते. त्यावर कॅगने राज्याच्या नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करून तीव्र नापसंती दर्शविली. 

त्या अनुषंगाने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा स्थानिक संस्था अहवालातील शिफारशीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. या आठ महापालिकांना स्थायी समित्यांनी वर्ष २०१०-१५ दरम्यान मंजूर केलेल्या प्रयोजनासाठीच ५४८.२४ कोटी इतकी संचयी भांडवली अनुदाने वापरण्याचे निर्देश नगरविकासने दिले आहेत. सोबतच ज्या महापालिकांनी अग्निसुरक्षा निधी राखीव ठेवला नाही. वार्षिक शुल्क आकारणी व संकलन सुरू केले नाही. ते कोणताही विलंब न लावता सुरू करण्याचे निर्देश नगरविकासने दिले आहेत.

लेखापरीक्षणातील आक्षेप अग्निसुरक्षा निधी न स्थापने, वार्षिक शुल्क न आकारणे, राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या योजनेची अंमलबजावणी न करणे, अग्निशमन केंद्राची अपर्याप्त संख्या, अग्निशमन केंद्रे सुसज्ज नसणे, मनुष्यबळाची कमतरता, अग्निसुरक्षा प्रमाणकांचे अनुपालन न करणे, क्षमता बांधणीतील तूट, प्रशिक्षणातील तूट शारीरिक स्वास्थ्य शिबिर आयोजित करणे, आगीचा तपासणी अहवाल तयार करण्याच्या कमतरतेसह अन्य मुद्यांवर कॅगने ताशेरे ओढले होते. राज्यातील आठ महापालिकांचे हे लेखापरिक्षण होते.

राज्यातील आठही महापालिकांना ५४८.२४ कोटीचे अनुदाने त्वरित वापरण्याचे निर्देश दिलेत. कॅगच्या शिफारशीनुसारही कार्यवाही करण्यात येत आहे.- विवेक कुंभार, अवर सचिव, नगरविकास विभाग, महाराष्ट्र

टॅग्स :Mumbaiमुंबईfire brigade puneपुणे अग्निशामक दलAmravatiअमरावतीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल