महाड : विवाहितेचा विनयभंग करून तिच्यासह तिच्या सासूला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आठ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील चोचिंदे येथे घडलेल्या घटनेत चार महिलांचा आरोपीत समावेश आहे.मे महिन्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडित महिलेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ही महिला घरात चुलीवर जेवण करीत असताना, मच्छिंद्र पवार याने तिचा विनयभंग केला. त्याचवेळी महिलेच्या सासूने घडलेला प्रकार पाहिल्यानंतर मच्छिंद्रला त्या प्रकाराबाबत जाब विचारला. त्याचवेळी मच्छिंद्रसह त्याच्या नातेवाइकांनी त्या पीडित महिलेसह सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मच्छिंद्र पवार, प्रकाश पवार, नितीन पवार, भरत पवार, ऊर्मिला पवार, रिना पवार, तनुजा पवार, संगीता पवार या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंगप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: July 19, 2016 2:42 AM