मुंबई : मंत्रीपदासाठी सध्या तिष्ठत असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची मंगळवारी औरंगाबाद विमानतळावर ‘धावती भेट’ झाली.औरंगाबाद येथील काँग्रेस कार्यकर्ता शिबिर आटोपून दिल्लीकडे निघालेले मोहन प्रकाश हे विमानाच्या प्रतीक्षेत विमानतळावर वेटिंग रूममध्ये बसून होते. तर औरंगाबाद येथील एका भाजपा कार्यकर्त्याचा वाढदिवस आटोपून खडसे हेदेखील दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आले. खडसे आणि मोहन प्रकाश हे दोघेही वेटिंग रूममध्ये समोरासमोर बसल्याने उभयतांमध्ये ‘हवा-पाण्यावर’ चर्चा झाली.खडसे म्हणाले, मोहन प्रकाश आणि मी एकाच विमानाने दिल्लीला आलो. मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही दोघेही ‘वेटिंग रूम’मध्ये काही काळ होतो, पण तिथेही नमस्कारापलीकडे काही घडले नाही. माझ्याबाबत सध्या अनेकांना कळवळा आला असल्याने ते अशा भेटीला राजकीय भेटीचे स्वरूप देत असल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एकनाथ खडसे-मोहन प्रकाश भेटले ‘वेटिंग रुम’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:21 AM