शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

By admin | Published: May 31, 2016 6:50 AM

एकापाठोपाठ झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी चहूबाजूंनी कोंडी केल्यामुळे खडसे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी, ३० कोटींचे लाच प्रकरण, कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या घरातील दूरध्वनीवर झालेले कथित संभाषण, जावयाची लिमोझिन कार आणि सिंचन घोटाळा... अशा एकापाठोपाठ झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी चहूबाजूंनी कोंडी केल्यामुळे खडसे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.महसूलमंत्री खडसे यांना मंत्रिपदावरून तत्काळ हटवा, या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेलेले असतानाच खडसे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड सुमारे दीड तास चर्चा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. राजीनाम्यासाठी खडसे यांच्यावर विरोधकांनी दबाव वाढवला असतानाच पक्षातून त्यांच्या खातेबदलाचे संकेत मिळत आहेत.खडसेंना मंत्रिपदावरून हटवादाऊदच्या घरातील दूरध्वनीवरून झालेले संभाषण, पुणे येथील एमआयडीसीतील जमीन घोटाळा आणि ३० कोटींची लाच ही सर्व प्रकरणे गंभीर असून, त्याची नि:पक्ष चौकशी होण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना तत्काळ मंत्री पदावरून हटविले पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली....तर ‘वर्षा’बाहेर उपोषणखडसेंविरोधात पुरावे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारपर्यंत खडसेंचा राजीनामा घ्यावा; अन्यथा वर्षा बंगल्याबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.> मुख्यमंत्र्यांनी दिली महसूलमंत्र्यांना समजयदु जोशी ल्ल मुंबई ‘आपल्यावर होत असलेल्या प्रत्येक आरोपाचे आपण ज्या पद्धतीने खंडन करीत आहात त्यातून आणखी नवे आरोप आपल्यावर होत आहेत. वादळ निर्माण करणारी विधाने टाळा. आपल्यावरील आरोपांना कायदेशीर उत्तर देण्यावर भर द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना समजावल्याचे सूत्रांनी सांगितले. खडसे यांनी आज वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे या वेळी उपस्थित होते. खडसे हे सोबत फायली घेऊनच आले होते. त्यांनी एकेक प्रकरणाचा खुलासा मुख्यमंत्र्यांसमोर केला. ठाणे जिल्ह्यातील जमिनीचे प्रकरण, पुण्यातील एमआयडीसीच्या जमिनीचे प्रकरण, दाऊद इब्राहिमला झालेले कॉल्स या कुठल्याही प्रकरणात आपला काहीही दोष नाही, असे पटवून सांगताना खडसे उद्विग्न झाल्याचे जाणवत होते. खडसेंचे सगळे म्हणणे ऐेकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मीडियासमोर न बोलण्याचा सल्ला दिला. शिवाय, सध्या आपण ज्या पद्धतीने बोलत आहात त्यामुळे अडचणींमध्ये वाढ होत आहे. आपल्यावरील आरोपांचे उत्तर देताना दुसऱ्यांवर हेत्वारोप केले जात असतील तर लोकांची सहानुभूती मिळत नाही, अशी राजकीय ‘शहाण’पणाची जाणीव करून दिली. त्यावर ‘यापुढे आपण काळजी घेऊ,’ असे खडसेंनी सांगितल्याचे कळते. विस्तारात पंख छाटणार!सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, खडसे यांना लगेच मंत्रिमंडळातून काढले जाणार नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संभाव्य विस्तारात खडसेंकडील महत्त्वाची किमान तीन खाती काढली जातील, असे समजते.