काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी जास्त पसंती असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यावरून शिंदे-फडणवीस, भाजप-शिवसेनेत बिनसल्याची चर्चा रंगली होती. थोडी धुसफुसही सुरु झाली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.
पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...
ती जाहिरात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे मला भेटले. त्यांनी चूक मान्य केली. काही पदाधिकाऱ्यांच्या आणि काही लोकांमुळे ही जाहिरात आल्याचे त्यांनी मान्य केले असे सांगत एका जाहिरातीमुळे युतीत काही बिनसलेले नाही. दोघेही नैसर्गिकपणे एकत्र आलोय. यामुळे एका जाहिरातीचा यावर परिणाम होणार नाही. आमचे सरकार असेच चालणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
याचबरोबर फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा जागेवरून सुरु असलेल्या धुसफुसवरही भाष्य केले आहे. ही जागा युतीची असेल, शिवसेनेचीच असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. न्यूज चॅनल रिपब्लिकला फडणवीस यांनी मुलाखत दिली.
शिवसेना-भाजप जागावाटप आधीसारखेच...शिवसेना आणि भाजपची आमची जी सीट शेअरींग होती, त्याचप्रमाणे लोकसभेसाठी शेअरींग होईल. त्यांच्यासोबत जेवढे खासदार आले आहेत, त्या जागा त्यांनाच मिळतील. शिवसेना जेवढ्या जागा लढत होती, तिथे त्यांच्याकडे योग्य उमेदवार असल्यास त्या जागा त्यांनाच मिळतील. आम्ही ज्या जागा लढवत होतो, त्या जागांवर आम्हीच निवडणूक लढवणार आहोत. विधानसभेलाही जवळपास तसंच होईल, जास्त अपेक्षा ना आम्हाला आहेत, ना त्यांना, अशा शब्दांत फडणवीसांनी जागावाटपाच्या चर्चांवर पडदा टाकला.