शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
2
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
3
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
4
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
5
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
6
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
7
माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी
8
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
9
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन
10
तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?
11
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."
14
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
15
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
16
काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'
17
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
18
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
20
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 8:57 AM

महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांच्याकडे केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

BJP Amit Shah ( Marathi News ) : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरुवातीला गैरहजर राहिल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र नंतर अमित शाह हे परतीच्या प्रवासाला निघण्याआधी अजित पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर शाह यांची भेट घेत चर्चा केली. एकीकडे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत आता आणखी एक माहिती समोर आली असून महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांच्याकडे केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित  शाह यांच्याकडे केल्याचे समजते. याबाबत 'द हिंदू' या दैनिकाने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांच्या या मागणीला अमित शाह हे सहमती देणार का आणि या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष कसा प्रतिसाद देणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप किती जागांसाठी आग्रही?

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने किमान १५० जागा लढवाव्यात, यासाठी महाराष्ट्र भाजपमधील नेते आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीच्या जागावाटपात आपल्या वाट्याला किमान ७० जागा याव्यात, अशी अपेक्षा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर रविवारीच मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते. पण, अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाह