शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 6:03 AM

या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत.

दीपक भातुसे । लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई:एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार ३० जून रोजी राज्यात अस्तित्वात आले. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याला शनिवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या निर्णयाचा गाेषवारा…

मुख्यमंत्र्यांकडील विभागाचे महत्त्वाचे निर्णय

- समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढवण्याचा निर्णय- कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ च्या १० हजार कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता- मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ५ हजार ५०० कोटींचा निधी- धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय- नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय- एमएमआरडीएला विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्याचा निर्णय

इतर विभागांमधील महत्त्वाचे निर्णय  

- दिवाळीच्या तोंडावर राज्यातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल  - १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहन मदत - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत वाढीव मदत  - निकषात बसत नसलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत- शंखी गोगलगाईंमुळे बाधित शेतकऱ्यांना ९८ कोटी रुपयांची मदत - पेट्रोलच्या करात पाच रुपये आणि डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात- पोलिसांच्या ७२३१ पदांच्या भरतीचा निर्णय- विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनाचा निर्णय - एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पद भरतीचा निर्णय - वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय- पोलिसांच्या नैमित्तिक रजा १२ वरून २० करण्याचा निर्णय

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस