लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते सहाव्यादा मंत्री झाले.मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत शिर्डीहूनच मुंबई गाठली व मंत्री पदाची शपथ घेतली. आजच्या विस्तारात शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरले.
१९९५ साली इंदिरा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकत विधानसभेत प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी १९९७ ला शिवसेनेत प्रवेश करत पहिल्यांदा मंत्री पद मिळविले. त्यानंतर पुन्हा ते स्वगृही परतले आणि काँग्रेसकडून मंत्री झाले.काँग्रेस,शिवसेना पुन्हा काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले विखे पाटील सध्या भाजपमध्ये चांगलेच स्थिरावले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.सहाव्यांदा मंत्री झालेले विखे पाटील यांचा हा राजकीय प्रवास.
राजकीय प्रवास:१ मार्च १९९५ - विधानसभा सदस्य (शिर्डी विधानसभा)१९९७ ते १९९९ - मंत्री (कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय)जुलै १९९९ - विधानसभा सदस्यपदी निवड ऑक्टोबर २००४ - विधानसभा सदस्यपदी निवड१९ फेब्रुवारी २००९ - मंत्री (शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री,औरंगाबाद जिल्हा)ऑक्टोबर २००९ - विधानसभा सदस्यपदी निवड७ नोव्हेंबर २००९ - मंत्री (परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय)१९ नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ - मंत्री (कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती१९ ऑक्टोबर २०१४ - विधानसभा सदस्यपदी निवड१० नोव्हेंबर २०१४ -- काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड२४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते१६ जून २०१७- भाजपाच्या वतीने गृहनिर्माण मंत्री
संघटनात्मक पदे : १९८५-१९९० अध्यक्ष अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस (आय) १९८८-१९९० सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (आय)
इतर महत्त्वाची पदे :अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, मुळा-प्रवरा सहकारी वीज सोसायटी अध्यक्ष, या पदाबरोबरच विद्यामान अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, , विद्यामान अध्यक्ष प्रवरा शिक्षण संस्था आदी संस्थांचे अध्यक्षपद ते भूषवित आहेत.