शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, तुम्ही काय सांगता? CM शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:16 IST

'सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांचा वारंवार अपमान केला जातोय.'

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. काल मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना थेट सुनावलं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यात एकनात शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.  

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'राहुल गांधींच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. अशा महान व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय. राहुल गांधींनी फक्त एक दिवस अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं, मग त्यांना या स्वातंत्र्याची जाणीव होईल.' 

हा तर देशद्रोह आहे'राहुल गांधींच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध सगळ्यांनी करायला पाहिजे. ते वारंवार म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग, देशाबद्दल प्रेम अंगात असायला पाहिजे. तुम्ही काय सावरकर होणार...तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. देशातील लोकशाहीबाबत बोलता, पंतप्रधान मोदींबद्दल बोलता. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे समजू शकतो, पण परदेशात जाऊन निंदा करणे देशद्रोह आहे,' अशी जहरी टीकाही त्यांनी यावेली केली. 

उशीरा सुचलेले शहानपण...सावरकर फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्या दैवताचा अवमान वारंवार होतोय. नुकतेच राज्याचे अधिवेशन झाले, त्यात हिंदुत्व-हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात एकही शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली, त्याविरोधात यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. कालचे वक्तव्य म्हणजे, उशीराने सुचलेले शहानपण आहे. आम्ही राहुल गांधींचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो,' असंही शिंदे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस