शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 8:48 PM

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.

Eknath Shinde ( Marathi News ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे पितापुत्रावर टीकास्त्र सोडलं आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा 'कारटं' असा उल्लेख केला. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,  “लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा. हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण आहे ,” असा हल्लाबोल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना केला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही. आम्ही कामातूनच उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते बिथरले आहेत,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला असून मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वरुण सरदेसाई, कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे