Maharashtra Politics: “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:30 PM2022-09-16T23:30:53+5:302022-09-16T23:31:49+5:30

अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी पलटवार केला आहे.

eknath shinde group rebel mla gulabrao patil replied ncp ajit pawar over criticism | Maharashtra Politics: “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

Maharashtra Politics: “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचं का?”

Next

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच महाविकास आघाडीमधील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. तर शिंदे गट आणि भाजपही पलटवार करत आहे. अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग त्यांनाही गद्दार म्हणायचे का, असा रोकडा सवाल शिंदे गटातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली होती. याच टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणे त्यांचे काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचे का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले 

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी फक्त त्यांनी फक्त सरकारवर टीका केली, सरकारच्या चांगल्या कामाबद्दल अजित पवार यांनी ऊहापोह त्यांनी केला नाही, असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी केला. 

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा खरमरीत सवाल करत, दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जबाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्याला बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तसेच कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणून पालकमंत्री नियुक्त होत नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला. 

 

Web Title: eknath shinde group rebel mla gulabrao patil replied ncp ajit pawar over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.