शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंची कीव येते, टीका करणे म्हणजे राजकारण नाही”; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 5:50 PM

Maharashtra Political Crisis: सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही कधी बघता आले नाही, अशी टीका शिंदे गटातील आमदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटातील आमदारही आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. आदित्य ठाकरे यांची कीव येते. केवळ टीका करणे म्हणजे राजकारण नाही, असे शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे. 

पाच वर्षांपूर्वी पाचोरा शहरात आदित्य ठाकरे आले होते. मात्र त्यावेळचं चित्र व आताच चित्र बदललेले होते. हा विकास या अडीच वर्षांमध्ये झाला व तो फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला, असे किशोर पाटील यांनी नमूद केले. विकास कामांवरून कौतुकाची थाप देण्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी नेहमी टीका केली. केवळ टीका करणे म्हणजे राजकारण होत नाही. आदित्य ठाकरे यांची मला कीव येते. सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही बघू शकलो नाही, हे माझे दुर्भाग्य आहे, असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रमेश सोळंकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रा दौऱ्यापूर्वीच अमरावतीचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. शिंदे गटात जाणे म्हणजे शिवसेनेच्या वेगळ्या गटात जाण्यासारखे आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विचार करता ज्यांनी मागच्या निवडणुकीत मला ६६ हजार मतदान केले त्यांची इच्छा आहे आपण भाजपत गेले पाहिजे. भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि  राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सर्वानुमते शिवसैनिकांसह भाजपत प्रवेश असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे