शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
2
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
3
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 
4
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
5
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
6
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
7
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
8
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
9
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
10
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
11
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी
12
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?
13
"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन
14
“...तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”; परभणीत आंदोलन चिघळले, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
15
“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे
16
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती
17
फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी
18
SMAT 2024, BRD vs BEN : भावाच्या कॅप्टन्सीत हार्दिकनं दाखवली गोलंदाजीतील ताकद; मग संघाला मिळालं सेमीचं तिकीट
19
रिल्ससाठी हायवेवर दहशत; विधानसभा अध्यक्षांच्या गाडीला केलं ओव्हरटेक
20
Gold Price : चीनमुळे वाढतेय सोन्याची किंमत! 'या' कारणामुळे गोल्डचा साठा वाढवतोय ड्रॅगन

"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 1:14 PM

एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Gulabrao Patil : देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शपथ घेणार घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र त्याआधी देवेंद्र फडणीसांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करुन उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याची विनंती केली. मात्र एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर आज पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे या सरकारमध्ये राहणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक देखील झाली. शिवसेना आमदारांनीही एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी तयार झाले. दुसरीकडे, आमच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा असं शिंदेंना वाटत होतं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. पण एकनाथ शिंदेनेच पदभार सांभाळावा ही आमची इच्छा आहे असेही पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद मिळावा अशी इच्छा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एबीपी माझासोबत गुलाबराव पाटील बोलत होते.

"काँग्रेसलाही कधी एवढं यश आलं नव्हतं तेवढे यश या सरकारला मिळाले आहे. पाच वर्षे सरकार सुरळीत चालण्यासाठी एवढं जनमत मिळालं आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्हाला कामातून खरं उतरावं लागणार आहे. आज सगळ्यांकरता आनंदाचा दिवस आहे. कालपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही असं चित्र होतं. पण सगळ्या आमदारांनी त्यांना जाऊन रात्री विनंती केली आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची या राज्याला गरज आहे. तिघेही जर एकत्र राहिले तर राज्याचा विकासाला मोठा फायदा होणार आहे. त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत," असं गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली आहे का असं विचारला असता गुलाबराव पाटील यांनी "उपमुख्यमंत्री होण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यातून कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं. पण सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्हीच उपमुख्यमंत्री व्हा आणि तुम्ही सत्तेत राहा कारण तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही," असं म्हटलं.

निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी रोज दहा दहा सहभाग घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सगळ्यांकरता काम केलं. दोन महिन्याची केलेली कसरत आता बाहेर निघत आहे. त्यामुळे ते आजारी होते. त्याचाही अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस