"मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:17 PM2022-11-19T18:17:22+5:302022-11-19T18:18:02+5:30
विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहेत असं बाळासाहेबांच्या शिवसेनेनं म्हटलं.
ठाणे - किसननगरमध्ये जे काही घडलं ते सगळ्यांनी पाहिले. योगेश जानकर यांच्या कार्यालयाबाहेर कोण गेले, कशासाठी गेले या सगळ्या माहितीये. राजन विचारे हे भयभीत झाले. त्यांना स्वप्नातही मुख्यमंत्री दिसतात. एखादा मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवला असं म्हणणारे हे लोक, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं.
नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यावेळी योगेश जानकर यांच्या अंगावर मुलांना सोडलं. तेव्हा तेथील जमाव त्या मुलांच्या अंगावर गेला. तेव्हा खासदार राजन विचारे रिक्षात बसून पळून गेले. सगळ्यांकडे फुटेज आहे. त्यामुळे राजन विचारे काय बोलतात यावर आम्ही लक्ष देत नाही असं त्यांनी म्हटलं.
राहुल गांधींबद्दल लोकांमध्ये रोष
देशाच्या स्वातंत्र्याकरिता ज्यांनी ज्यांनी बलिदान केले. विविध मतांचे विविध नेते आहेत. त्यामुळे एकाला चांगले बोलताना दुसऱ्याला वाईट बोलू नये. अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांची कामे त्यांच्यादृष्टीने महान आहेत. कुणीही कुणावर टीका करू नये या मताशी मी सहमत आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. राहुल गांधींनी जे म्हटलं त्यावर विरोध केला. विधानं करून विचार करायला काय अर्थ आहे. तोडा महाविकास आघाडी, तुमची तत्वे, विचार वेगवेगळे आहे. लोकांमध्ये राहुल गांधींबद्दल रोष आहे. त्यामुळे राहुल गांधींचे विधान अयोग्य आहे असं ते म्हणतात.
तुमचे हात गेले कुठे?
जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी स्वत: त्यांच्या प्रतिमेला जोड्याने हाणलं होते. मग आत्ताच्या नेत्यांचे हात गेले कुठे? का आंदोलन करत नाही. रस्त्यावर उतरत नाही. कदाचित शिल्लकसेनेकडे शिवसैनिक राहिला नाही. त्यामुळे ते रस्त्यावर उतरत नसतील. शिवसेनेने फक्त विधानं करून चालणार नाही. जी शिवसेना प्रत्येक गोष्टीवर रस्त्यावर उतरायची ती सेना कुठे आहे? शिवसेनेचे विरोध असता तर राहुल गांधींच्या पुतळ्याला जोड्याने हाणायला हवं होतं. केवळ दिखावा करण्याचं काम ठाकरे गट करतोय अशी टीका प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"