शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 8:29 PM

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

मुंबई: सराकरी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Eknath Shinde Devendra Fadnavis) नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये 55 हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून, त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच, राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.

याशिवाय, मुंबई महापालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या निर्णयामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी असणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuncipal Corporationनगर पालिका