शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
2
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
3
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
4
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
5
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
7
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
9
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
10
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
11
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
12
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
13
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
14
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
15
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
16
Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!
17
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
18
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
19
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
20
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

विठ्ठलाची महापूजा उद्धव ठाकरेच करणार? विश्वास प्रस्तावाबाबत न्यायालय काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 3:56 PM

Maharashtra political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे आपल्यासोबत सेनेच्या 40 आमदारांसह मविआच्या 50 आमदारांना घेऊन गेल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे आपल्यासोबत सेनेच्या 40 आमदारांसह मविआच्या 50 आमदारांना घेऊन गेल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 11 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

विठल्लाची पुजा उद्धव ठाकरे करणार..?एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सरकार कोसळणार असे म्हटले जात आहे. या बंडाच्या दिवसापासून पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा भाजप नेते देवेंद्र फडणवीस करणार, असे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावरही याचीच चर्चा होत आहे. पण, आता कोर्टाने 11 जुलैला पुढील सुनावणी ठेवली असल्याने, उद्धव ठाकरेच 10 जुलै रोजी विठ्ठलाची महापूजा करतील, असेही आता म्हटले जात आहे. पण, यात एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे फ्लोअर टेस्टची.

फ्लोअर टेस्ट झाल्यावर काय होईल?कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. पण, त्यापूर्वी शिंदे गटातील आमदार सरकारमधील आपला पाठिंबा काढून घेऊ शकतात. त्यामुळे सरकार कधीही कोसळू शकते, असे म्हटले जात आहे. याबाबत कोर्टाने म्हटले की, आमच्याकडे फ्लोअर टेस्ट बाबतचे प्रकरण आले, त्यामुळे आम्ही त्यावर बोलू शकत नाही. त्या प्रक्रियेत काही अयोग्य घडले असे कुणा पक्षकाराला वाटले तर ते दाद मागू शकतात, तेव्हाच आम्ही त्याची दखल घेऊ. त्यामुळे शिंदे गटाने 11 जुलैपूर्वीच अविश्वास प्रस्ताव दाखल केला तर सरकार कोसळू शकते.

आज कोर्टात काय झाले?आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना 5 दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 16 आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. 11 जुलैला पुढील सुनावणी होईपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 11 जुलै 5.30 पर्यंत 16 आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय