मुंबई: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'राजकीय भूकंप होणार नाही'माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "कालपासून माध्यमांमध्ये नॉट रिचेबल असल्याची बातमी पाहत आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत, हे खरं आहे. पण, विरोधक भूकंप होईल म्हणत आहेत, त्यात मला किंवा शिवसेनेला कुठलही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, पण आता आम्ही वर्षावर जातोय. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, तिथे सगळं स्पष्ट होईलच. आज सकाळपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत."
संबंधित बातमी- 'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन नेले', संजय राऊतांचे टीकास्त्र
'मध्यप्रदेश-राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न'राऊत पुढे म्हणाले की, "सध्या महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण, मध्यप्रदेश-राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहे, याप्रकारे तुम्हाला किंग मेकर होता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे राज्याला दुबळे करणे," असेही राऊत म्हणाले.
'शिवसेना कमजोर करण्याचे प्रयत्न'ते पुढे म्हणाले की, "आपण पाहिलं असेल मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभा लोढा यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली होती. त्यांची पावले कोणत्या दिशेने पडताय, हे सजमून घ्या. मुंबईवर विजय मिळवणे, ताबा मिळवे, म्हणजे शिवसेनेला कमजोर करणे होय. सेना दुबळी जाली पाहिजे, हे मोठ षडयंत्र आहे. पण, शिवेसनेत आईचे दुध विकणाऱ्या औलादी नाहीत. शिवसेना निष्टावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदांसाठी सवतःला विकणारे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद सेनेत नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.