Vidhan Sabha Floor Test Live: 'मी मुख्यमंत्री होणार होतो पण, अजित पवारांनी...; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:51 PM2022-07-04T16:51:00+5:302022-07-04T16:51:40+5:30
Vidhan Sabha Floor Test Live: ''...त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती."
Vidhan Sabha Floor Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला.
संबंधित बातमी- 'राज्यसभेत आम्ही फिल्डींग लावली होती, पण फडणवीसांनी गेम पालटला'; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना ही संधी मिळू शकली नाही. त्याऐवजी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला.
Initially, I was supposed to be made CM in the MVA govt... But later Ajit Dada (Ajit Pawar) or someone said that I should not be made CM. I had no problem and I told Uddhav ji to go ahead, and that I was with him. I never eyed that post: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/IUxiSDt0H1
— ANI (@ANI) July 4, 2022
काय म्हणाले मुख्यमंत्री?
"महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री होणार होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नका. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती," असे शिंदे म्हणाले.