शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Vidhan Sabha Floor Test Live: 'मी मुख्यमंत्री होणार होतो पण, अजित पवारांनी...; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 4:51 PM

Vidhan Sabha Floor Test Live: ''...त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती."

Vidhan Sabha Floor Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला. 

संबंधित बातमी- 'राज्यसभेत आम्ही फिल्डींग लावली होती, पण फडणवीसांनी गेम पालटला'; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना ही संधी मिळू शकली नाही. त्याऐवजी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला. काय म्हणाले मुख्यमंत्री?"महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री होणार होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नका. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती," असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा