मुंबई - २० मे रोजी वर्षावर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावले होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? नक्की काय आहे तुमच्या मनात? हे सगळे विचारले होते. हे जगजाहीर आहे. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, पडद्याआड जे काही चालले होते, कुणाला भेटायचे हे माहिती नाही. कुरबूर सुरू होती. आमदार सांगत होते. हे खरे आहे का? कुणाला घाबरताय? हे विचारायला बोलावले होते असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, वर्षावर आलेले तेव्हा ते रडत होते, अटकेची भीती होती. त्यांच्यावर दबाव होता असं म्हणत होते. ठाण्यात महिलेवर हल्ला झाला तिच्यावरच गुन्हा दाखल झाला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले म्हणून हल्ला झाला. उपचार घेत असताना त्यांना अटक करायला पोलीस पाठवले. ज्यांनी सुप्रिया सुळेंना शिव्या दिल्या ते मंत्री म्हणून पदावर कायम आहेत. सुषमा अंधारेंवर बोलणाऱ्यांवर कारवाई नाही. गद्दारांमुळे राज्याचे वाटोळे होत आहे. भाजपाने याचा विचार करणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तरभाजपासोबत न गेल्यास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील, उचलून नेतील म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेचाही पलटवारतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत.घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.