खेड: खेडच्या गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी याच मैदानातून शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला शिदेंनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांनी ज्या लोकांना आपल्या जवळ केले नाही, तुम्ही अशा लोकांना जवळ केले. ज्यांनी पक्ष उभारला, मोठआ केला, तु्म्ही अशा लोकांना संपवलं, अशी टीका शिंदेंनी केली.
तुम्ही आपल्याच नेत्यांना संपवलं.ते यावेली म्हणाले, ज्या लोकांनी संघटनेसाठी जीवाची पर्वा केली नाही, घरावर तुळशीपत्र ठेवले, स्वतःवर केसेस घेतल्या, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता. ही सगळी देवासारखी माणस आहेत. तुम्हाला त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. ज्या रामदास कदमांनी पक्षाला वाढवलं, त्यांना तुम्ही संपवलं. योगेश कदम याची राजकारणाची सुरुवात झाली, त्याला तुम्ही संपवायला निघालात. दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्या. शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कारस्थान करुन व्यासपीठावरुन खाली उतरवायला लावलं. तोच डाव रामदास कदमांबरोबर आखला होता. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांबद्दल कारस्थान करू शकतो? आपल्याच खासदाराला पाडण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊ शकतो? असा नेता मी कुठेच पाहिला नाही.
कार्यकर्ता मोठा होतो तेव्हा पक्ष मोठा होताते पुढे म्हणाले, आज बाळासाहेब असते तर मनोहर जोशींबद्दल असे केले असते का... बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. धर्मवीर आनंद दिघे जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर आणण्यासाठी वैयक्तित शब्द टाकला. कार्यकर्त्याला पुढे नेणारे बाळासाहेब होते. तुम्ही कार्यकर्त्याला संपवायला निघालेत. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता मोठा होतो, तेव्हाच पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला की, तुमच्या पोटात दुखणे सुरू होते. राज ठाकरेंपासून नारायण राणेंपर्यंत आणि रामदास कदमांपर्यंत...तुम्ही नेत्यांना कार्यकर्त्यांना सपवलं.
तुम्ही रामदास भाई आणि गुलाबरावांची भाषण बंद केलीरामदास कदमांच्या भाषणाला आणि गुलाबराव पाटलांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं बंद करता. पक्ष मोठा कसा होणार...? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा. तुम्ही म्हणता, दरवाजा उघडा आहे, ज्याला जायचे त्यांनी जा...सगळेच जातील आणि तुम्ही दोघेच राहतील. हम दो हमारे दो...मी बोलतोय कारण आम्ही सहन केलंय. यांनी किती लोकं घालवले...तुमचा स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाही. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ताहोता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून कार्य करणार, असंही शिंदे म्हणाले.