खेड: काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट तयार झाले. एकीकडे उद्धव ठाकरे गट तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतली. यावेळी त्यांनी आपली तोठ डागली.
तोच-तोच थयथयाट...यावेळी बोलताना एकनाध शिंदे म्हणाले की, ते लोक आज आपली सभा पाहत असतील. पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. काही दिवसांपूर्वीच याच गोळीबार मैदानात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. परंतू, तोच-तोच थयथयाट...तिच तिच आदळ आपट, याला काय उत्तर देणार.
बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम केलंमुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून हाच थयथयाट आदळआपट सुरू आहे. तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली होती. त्यांचे महाराष्ट्रात सर्कसीप्रमाणे शो होणार आहेत. तेच आरोप, तेच रडगाणे फक्त जागा बदल. त्यांच्याकडे फक्त दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याबद्दल काय बोलणार. काही लोकांना वाटत असेल, यांच्या सभेला एवढी गर्दी कशी झाली. कोकणी माणसाने बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर प्रेम केलंय. हेच प्रेम या सभेने दाखवून दिलंय. आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, याच सभेने त्यांना उत्तर दिलंय.
सत्तेसाठी शिवसेना गहाण ठेवलीसत्तेसाठी यांनी काय केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवली. ज्या लोकांसोबत आम्ही निवडणूक लढवली, लोकांनी ज्या विचाराला मतदान केलं त्यांच्यासोबत गेलो. प्रत्येक पॅम्पेटवर बाळासाहेब आणि नरेंद्र मोदींचा फोटो होता. पण, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी या विचाराशी गद्दारी केली. याविरोधात आम्ही भूमिका घेतली आणि गद्दारीचा डाग पुसण्याचे काम केले आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला. बाळसाहेबांचा आशिर्वाद आपल्यासोबत आहे, म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही.