शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदेंचं उत्तर; मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 3:47 PM

एकनाथ शिंदे यांनी उघडपणे शिवसेना नेतृत्वासमोर बंड केल्यानंतर तातडीने शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालात क्रॉस व्होटिंग होऊन संख्याबळ नसताना भाजपाच्या पाचव्या उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचं संख्याबळ वाढलं त्याचसोबत महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेसची मते फुटली असल्याचं समोर आले. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे काही समर्थक आमदारांसह अचानक नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. शिंदे आणि आमदार गुजरातच्या सूरत येथे हॉटेलला असल्याचं कळाल्याने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची कुणकुण लागली. 

एकनाथ शिंदे यांनी उघडपणे शिवसेना नेतृत्वासमोर बंड केल्यानंतर तातडीने शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली. परंतु या बैठकीत शिवसेनेचे मोजकेच आमदार उपस्थित झाले. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांना गटनेते बनवलं. परंतु ही निवड बेकायदेशीर असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कारण शिवसेनेच्या ४५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा मला आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे गटनेता मीच असल्याचं शिंदे म्हणाले. 

शिवसेनेत बंडखोरी का केली?; शिवसैनिकांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

यानंतर शिवसेनेने मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने सर्व आमदारांना मुंबईत सायंकाळी ५ वाजता बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले. जर बैठकीस उपस्थित न झाल्यास कायदेशीर कारवाई करून सदस्यत्व रद्द होईल असं सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेच्या या खेळीला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात तांत्रिक लढाई सुरू झाल्याचं दिसून येते. 

शिवसेनेच्या पत्रात काय म्हटलंय?शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजता ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात येणार आहे. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वांना व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राजकीय परिस्थिती लक्षात घेता याला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे. 

बंडखोरांची आमदारकी रद्द होणार?; शिवसेनेची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना धक्का

तसेच ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई मेल पत्त्यावर पाठवलेली आहे. त्या व्यतिरिक्त समाज माध्यमे, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे कळवले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध, पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणांस गैरहजर राहता येणार नाही. या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे