शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचा एल्गार

By admin | Published: October 23, 2016 4:46 PM

ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा नारा देत रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

ऑनलाइऩ लोकमत
ठाणे, दि. 23 - ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा  नारा देत  रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.  संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद देणाऱ्या काही मागण्या पुढे  येऊ लागल्याने त्याचा विरोध करणे गरजेचे आहे. यासाठीच  हा संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी  सांगितले. 
ऍट्रॉसिटी कायद्याची अधिक कडक अमलबजावणी करण्यात यावी , नाशिक येथे दलित कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शा सन करा, दलित आदिवासींयावरील जातीय अत्याचारांना कठोर पायबंद घाला , कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,अट्रोसिटी कायद्याच्या अंलबजावणीची   श्वेत पत्रिका जाहीर करा, डॉ नरेंद्र दाभोलकर , कॉ गोविंद पानसरे , डॉ कलबुर्गी यांच्या मारेकर्यांना आणि खुनाच्या सूत्रधाराणा फाशीची शिक्षा द्या , विस्थापित भटक्या विमुक्त समाजाचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करा , इतर मागासवर्गीय समाजाचे घटनांत्मक आरक्षण कायम ठेवा , मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर करा , मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे, पाटील समितीचा अहवाल जाहीर करा , आदिवासींचे कुपोषण थांबवा , शेतकर्यक्रत्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेती धोरण जाहीर करा. कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल थांबवा, कंत्राटी पद्धत बंद करून बंद झालेले कारखाने सुरु करा , जमिनीचे राष्ट्रयीकरण करा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या मोर्चात नानासाहेब इंदिसे,  शामदादा  गायकवाड , चंद्रकांत हंडोरे, काकासाहेब खंबाळकर, रवी गरूड , समाधान नावकर, भय्यासाहेब इंदिसे,   सुनील खांबे, जितेंद्रकुमार इंदिसे , भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राजय गायकवाड, किरण चन्ने,  चंद्रभान आझाद, प्रमोद इंगळे, पंढरीनाथ गायकवाड, संदीप खांबे, मुश्ताक बाबा, अनिस कुरेशी, बाबासाहेब कांबळे , आबासाहेब चासकर   आदी मान्यवर उपस्थित होते 
 
अहमदनगर येथील कोपर्डी गावातील घटनेननंतर राज्यभरात ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. कोपर्डीची ती अमानुष घटना आणि संविधानाने  मागासवर्गीयांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी दिलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याचा काहीही संबंध नाही. तरीही राज्यातील जनतेमध्ये जाणीवपपूर्व या कायद्याच्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यांचे हे असे कृत्य संविधानाच्या उद्देशाला छेद देणारे आहे. म्हणूनच संविधानचा खरा देश हिताचा उद्देश तमाम भारतीय नागरिकांपर्यंत पोहचावा, संविधानाबाबत गैर समज पसरविणे थांबले जावे आणि या देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी   संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे  श्यामदादा गायकवाड यांनी यावेळा बोलताना सांगितले . रख  रखत्या  उन्हात लाखो दलित, आदिवासी, भटके विमुक्त ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे बांधव मोर्चाला मोठ्या संख्येने आले होते महिलांची उपस्थितीही प्रचंड प्रमाणात होती.