शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

By admin | Published: May 09, 2014 11:01 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सकृतदर्शनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे नमूद करून निवडणूक आयोगाने शुक्रवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

वादग्रस्त वक्तव्याची दखल नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सकृतदर्शनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे नमूद करून निवडणूक आयोगाने शुक्रवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. भाजपा सत्तेवर आल्यास देशात हिंसाचार होईल. २२,००० लोक मारले जातील, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. नोटिसीला १२ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर द्या. मुदतीच्या उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलान येथील १ मे रोजी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात भाजपाने आयोगाकडे तक्रार केली होती.राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरू असताना ईव्हीएम असलेल्या भागात प्रवेश करीत नियमांचे उल्लंघन केले काय, याबाबत तपास करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. तर भाजपाने वाराणशीमधील निवडणूक अधिकार्‍यावर पक्षपाताचा आरोप केल्यानंतर आयोगाने तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार यांना विशेष निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.शुक्रवारी दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत राहुल गांधी यांच्या ईव्हीएम प्रकरणावर चर्चा झाली. पुढील तपासासंबंधीचा अहवाल सोमवारी मिळण्याची शक्यता असून त्याच दिवशी आयोग निर्णय जाहीर करेल, असे निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रšाा यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रात राहुल गांधी यांनी ईव्हीएमची तपासणी केल्याच्या वृत्ताची शहानिशा करावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी गुरुवारी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)