'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 08:12 PM2024-02-06T20:12:45+5:302024-02-06T20:14:37+5:30

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिले आहे.

Election Commission of India on NCP ajit pawar sharad pawar, BJP's first reaction to NCP's decision | 'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

NCP Ajit Pawar Sharad Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. या निर्णयावर भाजपाचे प्रदेषाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'मी अजित पवारांचे खुप अभिनंदन करतो. त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडाळ्याचे चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले. निवडणूक आयोगाने आज अत्यंत महत्वाचा निकाल दिला आहे. जेव्हा आयोगाचा निकाल येतो, तेव्हा तो नियमाप्रमाणे, संविधानाला धरुन असतो. ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी आणि जास्त मतदानाचा कौल, त्यांच्याकडे तो निकाल जातो.'

'मला खात्री आहे की, अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून पक्ष वाढीसाठी काम करतील. आता विरोधकांचे विरोध करण्याचे काम आहे, तेच त्यांचे काम करत आहेत. पण, निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य नाही. आयोग कधीच बायस्ट निर्णय देत नाही. आयोग निर्णय देताना खुप दाखले देते, त्यामुळे आयोगाच्या निर्णयाला सर्वांनी स्वीकारले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Election Commission of India on NCP ajit pawar sharad pawar, BJP's first reaction to NCP's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.